|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ISRO ने शेअर केला चांद्रयान-2 कडून आलेला चंद्राचा पहिला प्रकाशातील फोटो

ISRO ने शेअर केला चांद्रयान-2 कडून आलेला चंद्राचा पहिला प्रकाशातील फोटो 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने गुरुवारी चंद्राच्या पृष्ठभागाचा पहिला प्रकाशातील फोटो ट्विटरवरून शेअर केला. हा फोटो चांद्रयान-2 च्या (IIRS) (इमेजिंग इफ्रारेड स्पेक्ट्रोमीटर) ने घेतला आहे. IIRS चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाला मापू शकते. चंद्राच्या उत्तर गोलार्धाचा हा फोटो अत्यंत सुस्पष्ट असा आहे. इस्त्रोच्या म्हणण्यानुसार, विक्रम लँडरचे चंद्र पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झाले होते. त्यामुळे त्याचा नासाशी संपर्क तुटला होता. पण चांद्रयान-2 चे ऑर्बिटर सुस्थितीत असून अजूनही ते चंद्राभोवती फिरत आहे.

Related posts: