|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » निवडणूक साहित्य व कर्मचाऱयांना घेऊन जाणाऱया एसटी बसचा अपघात

निवडणूक साहित्य व कर्मचाऱयांना घेऊन जाणाऱया एसटी बसचा अपघात 

प्रतिनिधी/ नागठाणे

निवडणूक साहित्य व कर्मचाऱयांना घेऊन निघालेल्या एसटी बस व खासगी ट्रव्हल्स यांच्यात वळसे (ता. सातारा) येथे अपघात झाला. रविवारी सकाळी 8 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात एसटी बसमधील काही कर्मचारी व ट्रव्हल्समधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. प्रशासनाने तातडीने दुसऱया एसटी बसची सोय करून कर्मचारी व निवडणूक साहित्य पुढे रवाना केले.

   रविवारी सकाळी पाटण विभागात निवडणूक साहित्य व कर्मचाऱयांना घेऊन फलटण आगाराची एसटी बस निघाली होती. महामार्गावर वळसे येथे बस आल्यावर या बसला पाठीमागून खासगी ट्रव्हल्सने धडक दिली. यामध्ये ट्रव्हल्स व बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. अपघातस्थळी महामंडळाचे अधिकारी व प्रशासनही पोहचले. यावेळी एसटी महामंडळाने तातडीने दुसऱया बसची व्यवस्था करीत निवडणूक साहित्य व कर्मचाऱयांना पुढे रवाना केले. अपघातात खाजगी ट्रव्हल्सचे नुकसान झाले आहे. मात्र, याची कोणतीही तक्रार बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली नव्हती.।़

Related posts: