|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘हरिवंशपुराण’ ग्रंथ ऐतिहासिक दस्तऐवज

‘हरिवंशपुराण’ ग्रंथ ऐतिहासिक दस्तऐवज 

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ कोल्हापूर

जैन पुराणे ही जैन दर्शन आचार्यधर्म इतिहास, संस्कृतीशी निगडीत आहेत. या सर्व पुराणांमधून जैन धर्मियांच्या संस्कृतीचे दर्शन घडते. त्यामुळे मराठी साहित्यात ‘हरिवंशपुराण’ हा ग्रंथ म्हणजे पुढच्या पिढीसाठी एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

भगवान महावीर यांच्या निर्वाण महोत्सवानिमित्त दीपोत्सवाचा प्रथम उल्लेख करणारे व नेमीप्रभूंचे संपूर्ण जीवनचरित्र लिहणारे आचार्य जिनसेन विरचित लिखित ‘हरिवंशपुराण’ या ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रा. महावीर कंडारकर यांनी केला आहे. मराठी अनुवादीत ग्रंथाच्या प्रकाशन सोहळय़ात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

डॉ. मोरे म्हणाले, ‘हरिवंशपुराण’ या ग्रंथाच्या मराठी अनुदवादामुळे बहुतांश मराठी भाषिकांना या ग्रंथाचा अभ्यासासाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयोग होईल. जैन संस्कृतीमधील आचार-विचार, प्रथा परंपरा या ग्रंथातून मांडल्या आहेत. प्रा. धनंजय शहा, प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. महावीर कांडारकर यांनी प्रास्ताविक केले. भारती उपाध्ये यांनी मंगलचरण गायले. सुरेश रोटे यांनी स्वागत केले. नीलम पाटील व प्रा. संदीप पाटील यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. सुजाता पाटील यांनी आभार मानले. यावेळी मंदीर कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल चमकले, एन. एन. पाटील, डॉ. बी. डी. खणे आदी उपस्थित होते.

 

Related posts: