|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » भर पावसात रत्नागिरीने टक्का राखला

भर पावसात रत्नागिरीने टक्का राखला 

राजापूरात सर्वात कमी, चिपळूणात सर्वाधिक

प्रतिनिधी/ रत्नागिरी

राज्यात मतदानाचा टक्का घसरलेला असताना रत्नागिरी जिह्यात मात्र सलग दोन दिवस पावसाचा तडाखा असूनही मतदानाचा टक्का राखला गेला आहे. जिह्यात एकूण मतदान टक्के झाले. 2009 साली 65.4 तर 2014 साली 64.2 टक्के मतदान झाले होते. चुरशीची लढत अपेक्षित असलेल्या चिपळूण व दापोली मतदारसंघात गतनिवडणूकीची टक्केवारी ओलांडली गेली. फारशी चुरस नसलेल्या दक्षिण भागातील अन्य मतदारसंघात मात्र गेल्या निवडणुकीच्या जवळपासच टक्केवारी राखली गेली.

सोमवारी सकाळचा दिवस स्वच्छ  सूर्यप्रकाशासह उगवला. कामावर जाणारे लोक सकाळी 7 ते 7.30 या वेळात मतदानाचा हक्क बजावून आपल्या कामाकडे निघाले. तथापि रत्नागिरी जिह्यात सकाळी 7 ते 9 या दोन तासांच्या कालावधीत फारसे मतदान झाले नाही. दापोली विधानसभा मतदारसंघात 9.50, गुहागरमध्ये 7.40, चिपळूणमध्ये 6.45, रत्नागिरीत 8.76, राजापूरमध्ये 8.93 टक्के एवढे मतदान झाल्याची नोंद झाली. दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत हळूहळू वाढ होत होती.

दुपारी 3 वा. दापोलीत 53.35, गुहागरमध्ये 43.87, चिपळूणमध्ये 52.25, रत्नागिरीत 45.65, राजापुरात 42.64 टक्के मतदानाची नोंद झाली. संध्याकाळी 6 वा. झालेल्या मतदानासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार दापोली विधानसभा मतदारसंघात 62 टक्के, गुहागरला 57.47, चिपळूणात 63, रत्नागिरीत 62 तर राजापुरात 50 टक्के एवढे मतदान झाले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

रत्नाqिगरी जिह्यात मतदानप्रक्रियेमध्ये कोठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. निवडणूक हिंसाचाराची नोंद नाही. शांततेत मतदान पार पडले. रत्नागिरी जिह्यात मतदान यंत्र बंद  पडल्याच्या अनेक घटना घडल्या. तथापि त्यांचा एकत्रित अहवाल उशिरापर्यंत उपलब्ध झाला नव्हता असे सांगण्यात आले.

रत्नागिरी तालुक्यातही व्होटींग मशिनमध्ये बिघाड

एकीकडे जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृती मोठी जनजागृती करण्यात आली, मात्र बऱयाच मतदान केंद्रावरील व्होटींग मशिन स्लो होणे, बंद पडणे अशा घटना घडल्या. प्रशासनाकडून जादा मशिनची उपलब्धता प्रत्येक केंद्रावर ठेवण्यात आली होती. तरीही काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मतदारांकडून समोर आली. तसेच तालुक्यात बहुतांश ठिकाणी मंडप वगैरे टाकण्यात आले नव्हते. लोकसभेला मात्र ही जबाबदारी प्रशासनाने चोख बजावली होती. अचानकपणे व्होटींग मशिन बंद तसेच मशिन काहीवेळा स्लो झाल्यामुळेही मतदारांना ताटकळत रहावे लागले. शहरातील महिला विद्यालय मतदार केंद्रातील व्होटींग मशिन स्लो झाले होते. तर मावळंगे, गावखडी, डिंगणी आदी ठिकाणी मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. तर रत्नागिरी तालुक्यातील शिरगांव काझी मोहल्ला येथे दुपारी अचानक लाईट गेल्याने मतदारांना अंधारात उभे रहावे लागले होते. तर पानवल मतदार केंद्रावरील अधिकारी सक्षमपणे काम करत नसल्याने त्यांच्याऐवजी सक्षम अधिकारी देण्यात आले, असे अनेक प्रकार तालुक्यात विविध ठिकाणी समोर आले. येथील देसाई हायस्कूलमधील सखी मतदान केंद्र सोडल्यास मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणतेही सेल्फी पॉईंट अथवा सजावट वगैरे काही नव्हती. यंदा मंडपही टाकण्यात आला नव्हता. अगदी सकाळी 10.30 ते 3 वाजेपर्यंत कडकडीत उन होते. त्यानंतर पाऊस पडला तरी मतदारांना सुरक्षित उभे राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था काही करण्यात आली नव्हती.

                   खेड तालुक्यात 7 ठिकाणी मशिनमध्ये तांत्रिक बिघाड

दापोली व गुहागर विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या खेड तालुक्यातील मतदान केंद्रांपैकी 7 ठिकाणी मशिनमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने गोंधळ उडाला. दुसऱया मशिनची उपलब्धता करून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. गुहागर मतदार संघात समाविष्ट असलेल्या लवेल, असगणी, संगलट, सापिर्ली, धामणदेवी, शिरगाव, तर दापोली मतदार संघातील माणी मतदान केंद्रावर अचानक मशिनमध्ये बिघाड झाल्याने 15 ते 20 मिनिटे मतदानाची प्रक्रिया खोळंबली होती. तालुक्यात सकाळच्या सत्रात मतदारांचा निरूत्साह दिसून आला. दुपारी 3 पर्यंत तालुक्यात अंदाजे 45 टक्के मतदान झाले होते. 

Related posts: