|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहर परिसराला पुन्हा पावसाने झोडपले

शहर परिसराला पुन्हा पावसाने झोडपले 

प्रतिनिधी/ बेळगाव

शहर आणि परिसराला सोमवारी सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाने झोडपून काढले. पावसाने सायंकाळपर्यंत विश्रांती घेतली होती. परंतु रात्री आठच्या सुमारास पावसाचा मारा सुरू झाला. त्यामुळे नागरिकांची पुन्हा धावपळ उडाली. सुमारे तीन तास हजेरी लावून पावसाने शहरवासियांना दणका दिला.

पावसाने थैमान घातल्याने रविवारी नागरिकांचे व्यवहार कोलमडले होते. सोमवारी दिवसभर पाऊस नव्हता परंतु नागरिकांनी पावसाचा धसका घेतला होता. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच बाजारपेठेकडे मोर्चा वळविला होता. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पावसाचा वर्षाव सुरू झाला आणि बाजारपेठ ओस पडली. दमदार सरींच्या माऱयाने शहराला चांगलेच झोडपले. बाजारपेठेसह शहर आणि उपनगरी भागात तळी निर्माण झाली होती. खड्डय़ांमधून वाट काढत जाताना दुचाकीधारकांचे हाल झाले. नागरिकांचा उत्साह पावसाच्या माऱयामुळे पाण्यात वाहून गेल्याची प्रतिक्रिया उमटली होती.

Related posts: