|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Top News »  मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवणार नाही : निवडणूक आयोग

 मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवणार नाही : निवडणूक आयोग 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

राज्यात काल 288 जागांसाठी मतदान पार पडले. आता उमेदवारांसह सर्वांनाच निकालाची धाकधुक असल्याचे पहायला मिळत आहे. परंतू, त्यातच मतमोजणी केंद्रावर जॅमर लावण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवणार नाही, अशी स्पष्ट भूमिका निवडणूक आयोगानं घेतली आहे.

ईव्हिएम मशीन या फुलप्रुफ आहेत. तसेच या मशीन्सना बाह्य यंत्रणांद्वारे हाताळता येऊ शकत नाही. त्यामुळे मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंगरूममध्ये मोबाईल जॅमर बसवण्याच्या प्रश्नच उद्भवत नसल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी स्पष्ट केले.

सिंग म्हणाले, आम्ही व्हिव्हिपॅट आणि ईव्हिएम मशीन्सबाबत सर्व ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवले आहेत. तसेच त्यांचा इंटरनेटशी, वायफायशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जॅमर लावण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही.

 

Related posts: