|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » मोदींनी दिल्या अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

मोदींनी दिल्या अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा… 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज वाढदिवस आहे. अमित शहा यांचा 55 वा वाढदिवस असून भाजपाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी शुभेच्छा देत अमित शहा यांना कर्मठ, अनुभवी आणि कुशल संगठनकर्ता या विशेषणांनी संबोधलं आहे.

मोदी म्हणाले, सरकारमध्ये बहुमूल्य योगदानासोबतच भारताला सशक्त आणि सुरक्षित बनवण्यासाठी ते महत्त्वाचं योगदान देतायेत. ईश्वर त्यांना दीर्घायूष्य देवो अशा शब्दात मोदींनी शहा यांना शुभेच्छा दिल्यात.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुमच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. तुमच्याकडून अशाच प्रकारे देशाची सेवा होत राहो, असं गडकरींनी म्हटलं आहे. याशिवाय अन्य अनेक नेत्यांनी शाह यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Related posts: