|Saturday, December 7, 2019
You are here: Home » leadingnews » शिवसेनेशिवाय भाजप राज्य करु शकत नाही : संजय राऊत

शिवसेनेशिवाय भाजप राज्य करु शकत नाही : संजय राऊत 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

राज्यात भाजपला शिवसेनेशिवाय पर्याय नसून, शिवसेनेशिवाय ते राज्य करु शकत नाहीत असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्याचबरोबर यावेळी शिवसेना विधनसभा निवडणुकीच्या निकालात 100 चा आकडा पार करेल असा आत्मविश्वासही व्यक्त केला.

राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी शिवसेनेच्या मोठय़ा विजयाचा विश्वास व्यक्त केला.

महायुती 200 चा आकडा पार करेल असा दावाही त्यांनी केला. महायुती 200 च्या वर जाणार हे सांगायला कोणत्याही पोल किंवा ज्योतिषाची गरज नाही असा टोला यावेळी त्यांनी लगावला. एक्झिट पोल आपापल्या पद्धतीने काम करत असतात. पोल घेण्याची आम्हाला काही गरज वाटत नाही. शिवसेना-भाजपा युतीच्या बाजूने निकाल लागणार हे स्पष्ट होतं.

संजय राऊत म्हणाले, मी गुळगुळीत बोलत नाही. मी अनेक वर्ष शिवसेनेत आहे. शिवसेनेचं काम करत आहे. बाळासाहेबांनी जे शिकवलं आहे, त्यापलीकडे माझं पाऊल पडणार नाही. शिवसेना पुढील सत्तेतही राहील. कोणी कितीही प्रयत्न केला तरी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणं शक्मय नाही. उद्याच्या निकालानंतर शिवसेना काय आहे ते कळेल असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.

 

Related posts: