|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » ‘मिशी’ची भीती खरी ठरली : श्रीनिवास पाटील

‘मिशी’ची भीती खरी ठरली : श्रीनिवास पाटील 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

उदयनराजे भोसले यांना माझ्या ‘मिशी’ची वाटणारी भिती अखेर खरी ठरली आहे, अशी प्रतिक्रिया श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा दारुण पराभव केला आहे. या दोन्ही उमेदवारांमध्ये सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून काटें की टक्कर पहायला मिळत होती. त्यानंतर उदयनराजे प्रत्येक फेरीत पिछाडीवर गेले.

अखेर विजयानंतर श्रीनिवास पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले, माझी निवडणूक ही लोकांनी हाती घेतली होती. त्यामुळे माझा विजय हा जनतेचा आणि शरद पवारांचा विजय आहे. उदयनराजेंना माझ्या ‘मिशी’ची भीती वाटत होती. ती त्यांना काही वेळा बोलूनही दाखविली होती. अखेर त्यांची भीती खरी ठरली. शरद पवारांना दगा दिल्यानेच उदयनराजेंचा पराभव झाला आहे, असेही ते म्हणाले.

Related posts: