|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » क्रिडा » रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत

रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत 

वृत्तसंस्था/ बेसिल

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या स्वीस खुल्या इनडोअर पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्वीसच्या अनुभवी रॉजर फेडररने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना अल्बॉटचा दुसऱया फेरीत पराभव केला.

बुधवारी झालेल्या दुसऱया फेरीतील सामन्यात टॉप सीडेड फेडररने अल्बॉटचा 6-0, 6-3 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. स्वीसच्या वावरिंकाने क्युवेसचा 6-3, 6-4, अमेरिकेच्या टिफोईने इव्हान्सचा 6-4, 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. सहाव्या मानाकित गोफीनने क्रोएशियाच्या सिलीकचा 6-3, 6-4, मिनारने अमेरिकेच्या फ्रीझचा 6-3, 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.

Related posts: