|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » सायना, सिंधू, सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत

सायना, सिंधू, सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत 

 प्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा

वृत्तसंस्था/ पॅरिस

पेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल, पीव्ही सिंधू आणि सात्विकराज-चिराग शेट्टी यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

आठव्या मानांकित सायनाने डेन्मार्कच्या लिने हॉजमार्क काएर्सफेल्टचा 21-10, 21-11 असा केवळ 27 मिनिटांत पराभव करून आगेकूच केली. याआधी सलग तीन स्पर्धांत पहिल्याच फेरीत पराभूत झालेल्या सायनाची पुढील लढत कोरियाच्या ऍन से यंगशी होणार आहे. यंगने गेल्याच आठवडय़ात डेर्न्माक ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधूला पराभवाचा धक्का दिला होता. सायनाने बुधवारी पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या च्युंग एन्नग यी हिचा 23-21, 21-17 असा पराभव केला होता.

अन्य एका सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधूनेही विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने सिंगापूरच्या येओ जिया मिनचा 21-10, 21-13 असा पराभव केला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनीही शेवटच्या आठमध्ये प्रवेश मिळविला आहे. या जोडीने इंडोनेशियाच्या मोहम्मद एहसान व हेंद्रा सेतियावान यांना चुरशीच्या लढतीत 21-18, 18-21, 21-13 असा पराभवाच धक्का दिला.

Related posts: