|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » माशे येथे घराला आग 50 हजारांची हानी

माशे येथे घराला आग 50 हजारांची हानी 

प्रतिनिधी /काणकोण

माशे-उत्राबांद येथील रोमाल्डिना फर्नांडिस यांच्या राहत्या घराला 24 रोजी पहाटे आग लागण्याची घटना घडली. काणकोणच्या अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन अंदाजे 5 लाखांच्या मालमत्तेचे रक्षण केले. या दुर्घटनेत अंदाजे 50 हजारांची हानी झाली. ही घटना पहाटे 5.20 च्या दरम्यान घडली. काणकोण अग्निशामक दलाचे अशोक देसाई, रत्नाकर वेळीप, प्रशांत वेळीप, नितीन नाईक, गणेश नाईक, प्रवीण बोरकर यांनी आग विझविण्याचे काम केले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Related posts: