|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हादईप्रश्नी अधिवेशन बोलवा

म्हादईप्रश्नी अधिवेशन बोलवा 

मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळास पंतप्रधानांची भेट घ्यावी

प्रतिनिधी/ पणजी

 म्हादई प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी एक दिवशीय अधिवेशन बोलवावे तसेच सर्वपक्षीय शिष्टमंडळाला घेऊन दिल्लीत म्हादई विषयावर पंतप्रधानांची भेट घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी कॉंगेस कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. म्हादई प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना केंदीय पर्यावरण व वन मंत्रालयाने कळसा-भांडुरा प्रकल्पाला पर्यावरण दाखला कसा दिला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

 राज्यात 2009 साली कॉंग्रेसचे सरकार असताना आपण मुख्यमंत्री असताना म्हादई विषयावर तत्कालीन पंतप्रधानांची भेट घेण्यात आली होती. तसेच म्हादई विषयी सुनावणीसाठी विशेष लवादही स्थापन करण्याची मागणी केली होती. गोव्यावर अन्याय होऊ नये यासाठी म्हादई जलतंटा लावादही अधिसूचित करण्यात आला होता.

 म्हादई विषय सर्वोच्च न्यायालयात असताना केंद सरकारने पर्यावरण दाखल देणे हा sगोव्यावर अन्याय आहे. पर्यावरण दाखल्याविषयी मुख्यमंत्र्यानाही अंधारात ठेवण्यात आले आहे. याचा फटका सत्तरी तसेच साखळी मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघाला बसणार आहे, असे कामत म्हणाले.

वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी कंपनीचे कंत्राट रद्द करावे

 वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी बसविणाऱया कंपनीचे कंत्राट रद्द करावे अशी मागणी त्यांनी केली. या कंपनीकडून योग्य प्रकारे काम केले जात नाही यामुळे सर्व वाहतूक कार्यालयांमध्ये सध्या गोंधळ सुरु आहे. या कामात कुठलाच भ्रष्टाचार न करता लोकांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी कामत यांनी केली.

जनतेचा पैसा योग्य ठिकाणी वापरावा

 सध्या गोव्याची आर्थिक स्थिती कोलमडली असताना सरकार व्हायबंट गोवा सारखे उत्सव साजरे करुन पैसे वाया घालवत आहे. पण स्थानिक कष्टाळू महिला गटांना माध्यान्ह आहाराचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही. सरकारने योग्य ठिकाणी पैसे खर्च करावे. जनतेचा पैसा विनाकारण नको त्या कामासाठी वापरु नये, असे आवाहनही कामत यांनी केले. यावेळी माजी केदीयमंत्री रमाकांत खलप, स्वाती केरकर, वरद म्हार्दोळकर उपस्थित होते.

Related posts: