|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आता डबल ढोलकी चालणार नाही : आमदार शिवेंद्रराजे भोसले

आता डबल ढोलकी चालणार नाही : आमदार शिवेंद्रराजे भोसले 

कुडाळ : प्रतिनिधी

जिल्हापरिषद गटामध्ये भाजप पक्षाला विधानसभेत घटलेले मतदान हे विचार करण्या सारखे आहे माझा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी ज्या पद्धतीने ताकद दिली त्याचे मोजमाप मतदानात कोठेही दिसून आले नाही त्यामुळे आता इथून पुढच्या कालखंडात डबल ढोलकी चालणार नाही बरेही माझ्याबरोबर निष्ठावंत पाच कार्यकर्ते राहिले तरी चालतील मात्र डबल ढोलकी वाजवणारा ना माझा आत्ताच इशारा आहे त्यांनी एक तर माझ्याबरोबर निष्ठा ठेवावी नाहीतर थेट माझ्याविरोधात राहावे अशी सनसनाटी चपराक कुडाळ जिल्हा परिषद गटातील सर्व व प्रमुख कार्यकर्त्यांना शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

कुडाळ जिल्हापरिषद गटामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमत शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटी प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती जावळीच्या सभागृहांमध्ये कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आलेल्या शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या परखड प्रतिक्रिया दिल्या. या कानपिचक्या मुळे उपस्थित काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जिव्हारी लागल्याने काही निवडक कार्यकर्त्यांचे चेहरे विरोधात काम करून गेले असल्याचे सांगून गेले.

अनेकजण माझ्या निवडणुकीपूर्वी व्यक्तिगत संपर्कात होते काहीजण कारखान्याचे कामगार होते तर काहीजण बरोबरीने सहकार्य व सहकारी म्हणून काम करत होते मात्र त्यांच्या गावातच मतदान हे कमी पडल्यामुळे व त्याची आकडेवारी वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून कोण कुठं कमी पडला की काम करण्याची पद्धत चुकीची ठरली हे आता पाहणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या काळामध्ये माझ्याशी संपर्कात राहून कोणीकोणी काय माझ्या पाठीमागे दिवे लावलेत हे लपून राहिलेले नाही. कुठे ना कुठे आणि कधी ना कधी बाहेर येतच ,आणि ते लपून राहिलेलं नाही. त्यामुळे कोणीही असा गैरसमज मध्ये राहू नये सगळ्या गोष्टी मला कळाले आहेत. निष्ठावंतांची पाठीवर नक्की हात फिरवे पण गद्दारी करणाऱ्या पाठीवर धोपाटा टाकेन असा नकळत इशारा ही यावेळी शिवेंद्रराजे यांनी दिला.

 आपल्याला आता भाजप म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. आणि त्या पद्धतीनेच भविष्यात आता आपल्याला तशी मांडणी करावी लागणार आहे. जे निष्ठा ठेवणारे आहेत त्यांना आता एक निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. भले पाच असले तरी ते माझ्याबरोबर प्रामाणिक असावेत जीवाला जीव देणारे असावेत दोन्ही दगडांवर हात ठेवणारे आता हे तिथून पुढे मला चालणार नाहीत असेही ते म्हणाले.

कुडाळ जिल्हा परिषद पडलेल्या कमी मतदानामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आवर्जून कुडाळ येथील उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषद गटातील प्रमुख नेते उपनेते कार्यकर्त्यांना कमी पडलेल्या मतदानाचा कळतनकळत जाब विचारला.

भाजप पक्ष वाढीसाठी जे निष्ठेने माझ्याबरोबर असतील त्यांनाच मी ताकद देईन मात्र माझ्याबरोबर राहून जे गद्दारी करतील त्यांना अद्दल घडवली जाईल असा इशाराही शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला त्यामुळे नेहमीच डबल ढोलकी वाजवणारे काही उपस्थितांनी हा इशारा ऐकल्यानंतर हाताची घडी आणि तोंडाचा चंबूच केला.

Related posts: