|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » भारतातून बाहेर पडण्याची योजना नाही : व्होडाफोन

भारतातून बाहेर पडण्याची योजना नाही : व्होडाफोन 

नवी दिल्ली :

भारतात सर्वात मोठा ग्राहक असलेल्या व्होडाफोन-आयडिया बंद होण्याच्या वृत्तावरून व्होडाफोनने याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले असून, भारतातून बाहेर पडण्याविषयी काहीच बोलू शकत नसल्याचे व्होडाफोन समुहाकडून सांगण्यात आले आहे. कंपनीने गुरुवारी बीएसईला दिलेल्या निवेदनात याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्याचबरोबर माध्यमांच्या वृत्ताबाबत बोलताना भारतातून बाहेर पडण्याची कोणतीही योजना नसल्याचे व्होडाफोन ग्रुपने म्हटले आहे. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांना चिंता करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट होत आहे.

व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरने मार्च 2017 मध्ये व्यवसाय विलीन करण्याच्या योजनेची घोषणा केली होती. दोन्ही कंपन्यांनी ऑगस्ट 2018 मध्ये आपले विलीनीकरण पूर्ण केले आणि तेव्हापासून तोटय़ाचा सामना करावा लागला. त्यामुळे कंपन्याचे ग्राहकही कमी होत आले आहेत. तसेच रिलायन्स जिओने कमी केलेल्या दरांशी स्पर्धा करण्यातही या कंपन्या मागे पडल्या आहेत.

Related posts: