|Monday, December 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » सौदीच्या अराम्कोकडून सर्वाधिक प्रदूषण

सौदीच्या अराम्कोकडून सर्वाधिक प्रदूषण 

वृत्तसंस्था  /नवी दिल्ली :

दिल्ली-एनसीआरसह देशाच्या मोठय़ा शहरांमधील वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या वायू प्रदूषणात नागरिकांचा हातभार असला तरीही कंपन्यांचे प्रकल्प या समस्येकरता मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत आहेत. जगातील सर्वाधिक प्रदूषण फैलावणाऱया कंपन्यांच्या यादीत सौदी अरेबियाची अराम्को आघाडीवर आहे.

अराम्को ही ऊर्जाक्षेत्रातील कंपनी 59262 मेट्रिक टन कर्बवायूचे उत्सर्जन दरवर्षी करत आहे. जगातील सर्वाधिक क्षमतेचे तेलशुद्धीकरण प्रकल्प बाळगणाऱया या कंपनीचा आर्थिक विस्तार कित्येक देशांपेक्षाही मोठा आहे.

अमेरिकेतील शेवरॉन ही कंपनी याप्रकरणी दुसऱया स्थानावर आहे. ही कंपनी दरवर्षी 43,345 मेट्रिक टन कर्बवायूचे उत्सर्जन करते. ही कंपनीसुद्धा ऊर्जाक्षेत्रात कार्यरत असून जगभरात याचे प्रकल्प आहेत.

प्रदूषणाच्या बाबतीत तिसऱया क्रमांकावर असणारी गाजप्रोम ही कंपनी मूळची रशियातील आहे. ही कंपनी दरवर्षी 43,230 मेट्रिक टन कर्बवायूचे उत्सर्जन करते. अमेरिकेत मूळ कार्यालय असलेली एक्सॉन मोबिल ही कंपनी सर्वाधिक प्रदूषण फैलावणाऱया कंपन्यांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. ही कंपनी 41,904 मेट्रिक टन कर्बवायूचे उत्सर्जन करते. इंधनक्षेत्रात कार्यरत

सर्वाधिक प्रदूषण फैलावण्याप्रकरणी पाचव्या क्रमांकावर असलेली नॅशनल इराणियन ऑईल ही कंपनी इराणच्या मालकीची आहे. या कंपनीकडून दरवर्षी 35,658 मेट्रिक टन कर्बवायूचे उत्सर्जन होते.

तर भारतीय सरकारच्या मालकीची कंपनी असलेली कोल इंडिया देखील कर्बउत्सर्जनात आघाडीवर आहे. जागतिक कंपन्यांच्या यादीत कोल इंडियाला 8 वा क्रमांक प्राप्त झाला आहे. कोल इंडियाकडून दरवर्षी 23124 मेट्रिक टन कर्बवायूचे उत्सर्जन केले जाते.

 

 

Related posts: