|Monday, December 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » बगदादीच्या खात्म्याची चित्रफित प्रसारित

बगदादीच्या खात्म्याची चित्रफित प्रसारित 

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन  :

अमेरिकेचा संरक्षण विभाग असलेल्या पेंटागॉनने इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीच्या खात्म्याची चित्रफित आणि छायाचित्रे प्रसारित केली आहेत. सेंट्रल कमांडचे जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली आहे. या चित्रफितीत अमेरिकेच्या विशेष पथकाने अत्यंत सुनियोजितपणे बगदादीच्या तळावर हल्ला केल्याचे आणि ही मोहीम सुमारे दोन तास चालल्याचे या चित्रफितीत दिसून येते.

बगदादीला कंठस्नान घालणाऱया सुरक्षा पथकानेच हे चित्रण केले आहे. या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचे एकूण 6 दहशतवादी मारले गेले असून यात 4 महिलांचा समावेश आहे. बगदादीने आत्मघाती स्फोट घडवून आणला असता 12 वर्षांपेक्षा कमी वयाची दोन मुलेही मारली गेली आहेत. परिसरातील लोकांना ताब्यात घेत त्यांची झडती घेण्यात आली. शस्त्रास्त्रs तसेच स्फोटके न आढळल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली असून यात 11 मुलांचा समावेश होता, अशी माहिती मॅकेन्झी यांनी दिली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातील अमेरिकेच्या सैन्याच्या विशेष मोहिमेत बगदादी मारला गेल्याची घोषणा रविवारी केली होती. बगदादीचा अनेक वर्षांपासून शोध घेतल जात होता असेही त्यांनी सांगितले होते. बगदादीच्या खात्म्याच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक स्टेटने पाश्चिमात्य देशांच्या विरोधात हल्ले करणार असल्याची धमकी दिली आहे.

डीएनए चाचणीद्वारे खातरजमा

इराकच्या कँप बुकामध्ये 2004 साली अटकेत असताना बगदादीच्या डीएनएचा नमुना प्राप्त करण्यात आला होता. मोहिमेची पूर्तता होताच एफ-15 लढाऊ विमानाद्वारे परिसरात बॉम्बफेक करण्यात आली. इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याचा मृतदेह आंतरराष्ट्रीय नियमांनुसार समुदात फेकण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱयांनी दिली आहे. अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा मृतदेहही समुद्रात फेकण्यात आला होता.

 

 

 

Related posts: