|Saturday, December 7, 2019
You are here: Home » Top News » धमणगावचे सूपुत्र सतीश खंदारे लडाखचे पहिले पोलीस संचालक

धमणगावचे सूपुत्र सतीश खंदारे लडाखचे पहिले पोलीस संचालक 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवून जम्मू – काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली. केंद्रशासित प्रदेश म्हणून गुरुवारपासून अस्तित्वात आलेल्या लडाखच्या पोलीस प्रमुखपदी मराठमोळय़ा सतीश खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली. अमरावतीच्या धमणगावचे सूपुत्र असलेले खंदारे हे लडाखचे पहिले पोलीस प्रमुख ठरले आहेत. ते 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सतिश खंदारे हे प्रथम जम्मू काश्मीर कॅडरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी श्रीनगर परिसरात वेगवेगळय़ा जिह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला. 2005 मध्ये हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक, 2007 मध्ये पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षक, तर सीआरपीएफ नागपूर येथे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक, खारघर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल विभागात पोलीस उप महानिरीक्षक म्हणून सेवा दिली. त्यानंतर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये दाखल होऊन दोन वर्षे पोलीस महानिरीक्षक म्हणून खंदारे यांनी कार्यभार सांभाळला.

सतीश श्रीराम खंडारे यांचं प्राथमिक शिक्षण अमरावतीमधील धमणगाव तालुक्मयातील जळका पटाचे येथील अशोक विद्यालयात झालं. दहावीची परिक्षा त्यांनी 1986 मध्ये 86 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण केली. त्यानंतर धमणगावांतील सेफला हायस्कूलमधून बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुणे येथील सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन ते 1992 मध्ये बीई झाले.

 

Related posts: