|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » उद्योग » वाहन क्षेत्र सावरले ? कार विक्रीत ऑक्टोबरमध्ये वाढ

वाहन क्षेत्र सावरले ? कार विक्रीत ऑक्टोबरमध्ये वाढ 

लवकरच 5-जी स्पेक्ट्रमचा भारतात लिलाव  शक्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मागील दहा महिन्यांपासून मंदीचा प्रवास करणाऱया वाहन क्षेत्रात ऑक्टोबर महिन्यात प्रथमच विक्रीत तेजीचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. सणासुदीच्या दिवसांमुळे मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत ऑक्टोबरमध्ये 4.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही तुलना सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत 25.11 टक्क्यांनी अधिक वाहनांची विक्री झाल्याची नोंद केली आहे.

ऑक्टोबर 2019 मध्ये एकूण 1,53,435 वाहनांची विक्री झाली असून हा आकडा 2018च्या दरम्यान 1,46,766 युनिट्सवर राहिली होती. ऑक्टोबरला कंपनीची निर्यात 5.7 टक्क्यांनी वाढून 9,158 वर राहिली आहे. तर सप्टेंबर 2019 मध्ये हा आकडा 7,188 वाहन निर्यात केली होती.

प्रवासी वाहन विक्री तेजीत

मारुतीची प्रवासी वाहन विक्री 4.4 टक्क्यांनी वाढून 1,06,002 युनिट्स राहिली आहे. कॉम्पॅक्ट कार सेगमेंट(स्विफ्ट, इग्निस, डिझायर, बलेनो)ची विक्री 15.9 टक्क्यांनी वधारली तर ऑल्टो वॅग्नारची विक्री 13.1 टक्क्यांनी कमी झाली आहे.

बजाजची वाहन विक्री

बजाज ऑटोची एकूण वाहन विक्री ऑक्टोबरमध्ये 9 टक्क्यांनी घसरुन 4.63 लाख युनिटवर राहिली आहे. मागील वर्षात ऑक्टोबरमध्ये कंपनीने 5.06 लाख वाहने विकली होती. महिन्याच्या आधारावर तुलना केल्यास बजाजची एकूण विक्री 15.2 टक्क्यांनी वाढून 4.63 लाख युनिटवर राहिली आहे.

 महिंद्राची विक्री मासिक आधारावर वाढली

महिंद्रा ऍण्ड महिंद्राच्या वाहनांची विक्री मागील ऑक्टोबरच्या तुलनेत 11 टक्क्यांनी घसरुन 51,896 राहिली आहे. तर सप्टेंबर 2019च्या तुलनेत यामध्ये तेजी नोंदवली आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये 58,416 वाहनांची विक्री झाली होती.

एमजी मोटरने 3,536 एसयूव्ही हेक्टर विकल्या

एमजी मोटार इंडियाकडून ऑक्टोबर महिन्यात एसयूव्ही हेक्टरच्या 3,536 गाडय़ाची किरकोळ विक्री झाली आहे. अशी माहिती कंपनीने शुक्रवारी दिली आहे. एमजी मोटरकडून जूनमध्ये सादर केलेल्या पहिल्या हेक्टर मॉडेलचे 38,000  बुकिंग ग्राहकांनी केले आहे. कंपनीने 21,000 कारचे बुकिंग केल्यानंतर जुलैमध्ये बुकिंग बंद केले होते. 29सप्टेंबरपासून हेक्टरचे पुन्हा बुकिंग सुरु केले आहे.

एस्कॉर्टची टॅक्टर विक्री 1.6 टक्क्यांनी वाढली

कृषी उपकरणे तयार करणारी कंपनी एस्कॉर्ट लिमिटेडच्या टॅक्टरची विक्री ऑक्टोबर महिन्यात 1.6 टक्क्यांनी वधारुन 13,353 वर राहिली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. एक वर्षापूर्वी याच कालावधीत ट्रक्टर विक्री 13,140 झाली होती. देशातील बाजारात ऑक्टोबरमध्ये ट्रक्टरची विक्री 1.3 टक्क्यांनी वाढून 13,034 युनिट झाली आहे.  

Related posts: