|Saturday, December 7, 2019
You are here: Home » उद्योग » चीनमध्ये 5-जी सेवा सुरू : महिना 1290 शुल्क

चीनमध्ये 5-जी सेवा सुरू : महिना 1290 शुल्क 

लवकरच 5-जी स्पेक्ट्रमचा भारतात लिलाव  शक्य

वृत्तसंस्था/ बीजिंग

मागील काही दिवसांपासून अमेरिका-चीनचे व्यापार युद्ध सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु यांचा योग्य सामना करण्यासाठी चीन आपली अंतर्गत शक्ती मजबूत करत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामध्ये व्यापार क्षेत्रांवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. शाओमी, हुआई या कंपन्यांच्या उत्पादनासोबत अत्याधुनिक सुविधा देण्यातही चीन मोठी झेप घेत असल्याचे समोर येत असतानाच चीनने गुरुवारी आपल्या देशात 5-जी नेटवर्कची सुरुवात करुन अमेरिकेला अप्रत्यक्षपणे धक्का दिलेला आहे.

चीनमधील मुख्य तीन सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या मार्फत 5-जी वायरलेस सेवा सादर केली आहे. देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी चायना मोबाईलकडून बीजिंग. शांघाई, शेंजेनसोबत तब्बल 50 शहरांमध्ये ही सेवा सुरु केली आहे.  5-जी इंटरनेट पॅपेजची सुरुवातीची किंमत 128 युआन (1290 रुपये) आहे.

चीनमधील दूरसंचार कंपन्यांनी मांडलेल्या अंदाजानुसार आगामी वर्षापर्यत चीनमध्ये 5-जी नेटवर्कचा वापर करणाऱया ग्राहकांची संख्या 17 कोटी होणार असल्याचे सांगितले आहे. तर एका संशोधनानुसार 5-जी सेवेचा लाभ घेण्यात 75000 ग्राहकांसोबत दक्षिण कोरिया दुसऱया स्थानी व अमेरिका तिसऱया स्थानी राहण्याचे संकेत सॅनफोर्ड सी बर्नस्टीनच्या संशोधकांनी व्यक्त केले आहेत.

विविध सुविधांना चालना

ड्रायव्हर लेस कार, कारखान्यांमधील ऑटोमेशनला चालना देणार असून यामुळे नागरिकांना लांब बसूनही कॉफी मेकर, ओव्हन यासारखी उपकरणे नियंत्रित करता येणार आहेत.

लवकरच भारतात सुविधा

भारतात आगामी काळात 5-जी स्पेक्ट्रमचा लिलावास सुरुवात करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतामधील 5-जी नेटवर्कची सुरुवात करण्यास विलंब लागण्याची शक्यता असून प्रायोगिक चाचणी येणाऱया वर्षात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

 4-जीपेक्षा 100 पट वेगवान सेवा

अल्ट्रा फास्ट मोबाईल इंटरनेट सेवा ही सध्या उपलब्ध असणाऱया 4-जी नेटवर्कपेक्षा 100 पट वेगवान असल्याची माहिती सरकारने दिली आहे. याच्या माध्यमातून ग्राहक काही सेकंदात 3 तासाचा चित्रपट डाऊनलोड करण्याची सोय मिळणार आहे. तर र्व्हच्युअल रियल्टी ऍपचा उपयोग करता येणार आहे. 

Related posts: