|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » म्हाडा अध्यक्ष उदय सामंत आज जिल्हा दौऱयावर

म्हाडा अध्यक्ष उदय सामंत आज जिल्हा दौऱयावर 

प्रतिनिधी / ओरोस:

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष उदय सामंत 3 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या दौऱयावर येत आहेत. रविवारी 3 रोजी दुपारी 12.15 तारळ, उपळे, राजापूर येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी व कलमठ येथे आगमन, दुपारी 2.30 वाजता कलमठ, कणकवली येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी व जळकेवाडी, ता. कणकवली येथे प्रयाण. दुपारी 3 वाजता जळकेवाडी, कणकवली (भालचंद्र महाराज आश्रममार्गे)येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी व निवजे, देऊळवाडी, कुडाळ येथे प्रयाण. सायंकाळी चार वाजता निवजे, देऊळवाडी, कुडाळ येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी व माणगाव, कुंभारवाडी येथे प्रयाण, 4.30 वाजता माणगाव कुंभारवाडी येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी, सायं. 5.45 वाजता तळवडे, सावंतवाडी येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी व उभादाडा (ता. वेंगुर्ला) येथे प्रयाण, सायं.5.45 वाजता उभादांडा, वेंगुर्ला येथील मच्छीमारांच्या नुकसानीची पाहणी, सायंकाळी 6 वाजता उभादांडा येथील भातशेतीच्या नुकसानीची पाहणी, सायंकाळी 6.30 वाजता उभादांडा येथून गोव्याकडे प्रयाण.

Related posts: