|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » घटप्रभा स्थानकावर यशवंतपूर-पंढरपूर रेल्वेचे स्वागत

घटप्रभा स्थानकावर यशवंतपूर-पंढरपूर रेल्वेचे स्वागत 

वार्ताहर/ घटप्रभा

येथील रेल्वे स्थानकावर यशवंतपूर-पंढरपूर एक्सप्रेस गाडीला थांबा देण्यात आला आहे. त्यानुसार सदर रेल्वे घटप्रभा स्थानकावर येताच प्रवासी व वारकऱयांनी रेल्वे इंजिनचे पूजन करून स्वागत केले. तसेच चालक व सहकाऱयांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मिठाईचे वाटप करण्यता आले. शुक्रवार 1 नोंव्हेबरपासून घटप्रभा स्थानकावर रेल्वेला थांबा दिल्याने पंढरपूरला जाणाऱया भाविकांना व यशवंतपूरला जातानाही थांबा असल्याने बेंगळूरला ये-जा करणे सोपे झाले आहे. त्यामुळे प्रवाशांसह भाविकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

  घटप्रभा रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे यशवंतपूर-पंढरपूर गाडीचा थांबा द्यावा, अशी मागणी अनेक महिन्यांपासून हुबळी विभागाकडे करण्यात येत होती. यासाठी आंदोलनेही करण्यात आली. पण याची विभागाकडून दखल घेण्यात आली नाही. दरम्यान या क्षेत्राचे खासदार सुरेश अंगडी रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर प्रवासी व भाविकांच्या समस्येची दखल घेत रेल्वे अधिकाऱयांची भेट घेऊन यशवंतपूर-पंढरपूर रेल्वेला घटप्रभा स्थानकावर थांबा देण्याची सूचना केली होती. त्यानुसार शुक्रवारी सदर रेल्वेला थांबा देण्यात आला आहे. यावेळी हभप मल्लाप्पा हुक्केरी, हभप हनुमंत शास्त्री, नवीन कडेली, निवृत्त शिक्षक एस. एच. गिरडी, सुरेश पाटील, सुरेश काडदावर, मल्लिकार्जुन गोरोणी, डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. पुजार, बसवराज बेळन्नवर, ईश्वर राजापुरे, श्रीकांत कुलकर्णी, मुगरवाडी, राजू कत्ती, चिरागअली मकानदार, पत्रकार रमेश जिरली, सुभाष गायकवाड, रमेश करोशी, श्रीनिवास चौगला, भरमू हुल्लाळी, किरण वाली, केंचप्पा नाईक आदी उपस्थित होते.

Related posts: