|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शिवसेनेकडून कोळी बांधवांना मदतीचे वाटप

शिवसेनेकडून कोळी बांधवांना मदतीचे वाटप 

प्रतिनिधी / दापोली

क्यार वादळात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे येथील मासेमार बांधवांच्या फायबर होड्या वाहून गेल्या होत्या. त्यांना झालेल्या हानीतून सावरण्यासाठी शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार योगेश कदम यांच्यावतीने शिवसेनेकडून प्रत्येकी पाच हजार रुपये मदतीचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम हर्णे सभागृहात पार पडला.

क्यार वादळाच्या तडाख्याने हर्णे बंदरात उभ्या असणाऱ्या लहान फायबरच्या होड्या वाहून गेल्या होत्या. यांची संख्या सुमारे 65 च्या घरात जाऊन पोहोचली होती. याबाबत माहिती मिळताच नवनिर्वाचित आमदार योगेश कदम यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

 या घटनेचे पंचनामे पूर्ण होताच प्रत्येक बोट मालकाला 5 हजार रुपयांची प्राथमिक मदत शिवसेना पक्षाकडून देण्यात येईल अशी घोषणा हर्णे बंदरात येऊन केली होती. त्यानुसार आज शनिवारी सायंकाळी योगेश कदम यांनी हर्णे येथे येऊन या वादळामध्ये नुकसान झालेल्या सर्व कोळी बांधवांना प्रत्येकी पाच हजार रुपयेचे वाटप केले. यावेळी बोलताना आपण फक्त बोलत नाही तर करुन दाखवतो, असे देखील आ. योगेश कदम बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला हर्णेपाज येथील शिवसैनिक व कोळी बांधव आणि मासेमारी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी योगेश कदम यांचे आभार मानले.

Related posts: