|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » मनोरंजन » संगीतकार अशोक पत्की यांचा नवा संगीतप्रयोग ‘बकाल’

संगीतकार अशोक पत्की यांचा नवा संगीतप्रयोग ‘बकाल’ 

वयाच्या 78 व्या वर्षी सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी समीर आठल्ये दिग्दर्शित आगामी ‘बकाल’ या भव्यदिव्य ऍक्शनपटासाठी एक अनोखा संगीतप्रयोग केला आहे. अवीट गोडीची, सुमधूर चालीची गाणी देणारे अशोक पत्की यांचा पाश्चिमात्य शैलीतील हा संगीत प्रयोग पाहून संगीतविश्वात त्यांचे खूप कौतुक होत आहे. ‘बकाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुप्रसिद्ध छायाचित्रणकार समीर आठल्ये यांनी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांचे परमस्नेही अशोक पत्की यांच्यावर सोपवली. पण, चित्रपटाचा बाज हा तरुणाईशी निगडीत असल्याने आधुनिक पद्धतीचे पाश्चिमात्य शैलीचे संगीत निर्माण करावे लागेल, जे आपण कधीच केले नाही. हे जाणून अशोक पत्की यांनी समीर आठल्ये यांना नकार दिला. तरीही समीर आठल्ये यांनी त्यांना संगीत दिग्दर्शन तुम्हीच करा, असे आग्रहाने सांगितले.

मी नेहमीप्रमाणे हार्मोनियमवर गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतरचनांना चाली लावल्या आणि संगीत संयोजक मणी यांना ऐकवल्या. पण, मणी यांच्याही हे संगीत आवाक्याबाहेरचे होते. म्हणून मणी यांचे चिरंजीव सनी या नव्या दमाच्या डीजे स्टाईल संगीत संयोजकाकडून काम करून घेतले. आणि त्यानंतर मला स्वत:वरच विश्वास बसेना. माझ्या या नव्या प्रयोगावर ज्या पद्धतीने संगीत संयोजन झाले ते पाहून समीर आठल्येसह साशंक असलेली चित्रपटाची संपूर्ण टीम अवाप् झाली. इतकेच नव्हे तर मी कधी नव्हे ते पहिल्यांदा स्वत:ची चौकट मोडून एक आयटम साँग रचले आहे. या अशा बाजाची गाणी मी कधीच रचली नव्हती. त्यामुळे ही गाणी करताना भलतेच टेन्शन आले होते. कारण अंतिमत: ती कशी होतील याची पूर्ण कल्पना नव्हती. परंतु, दिग्दर्शक समीर आठल्ये आणि निर्माता राजकुमार मेन्डा यांनी ठेवलेला विश्वास मी सार्थ ठरवला. याचे मला समाधान आहे, असे उद्गार संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत प्रकाशन सोहळय़ादरम्यान व्यक्त केले.

एकूण पाच गाणी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली आहेत. तर नागपूरचे गीतकार सुरेंद्र मसराम आणि संगीतकार मोरेश्वर निस्ताने यांनी मारबत विशेष गाणे रचले आहे. अशोक पत्की यांची तीन गाणी सर्वांनाच थिरकायला लावणारी आहेत आणि आत्ताच्या भाषेत बोलायचे तर डान्स नंबर्स आहेत. एक गाणे स्फूर्तीगीत आणि पाचवे गाणे आयटम साँग आहे. यशराज स्टुडियोच्या विजय दयाल यांनी या गाण्यांचे मिक्सिंग केले आहे. सिद्धार्थ महादेवन, अमेय दाते, जसराज जोशी, हृषिकेश रानडे, महालक्ष्मी अय्यर, आदर्श शिंदे, माधुरी करमरकर, जान्हवी अरोरा, कविता राम, प्राजक्ता रानडे, धनश्री देशपांडे, अमफता दहीवेलकर आदी नव्या दमाच्या गायकांनी या गीतांना स्वरसाज चढविला आहे. दिलीप मेस्त्राr आणि दीपा मेस्त्राr या नफत्य दिग्दर्शकांनी त्यावर कळस चढविला आहे.

‘बकाल’ चित्रपटात गणेश यादव, यतीन कारेकर, पुजा नायक, नवोदित अभिनेता चौतन्य मेस्त्राr, जुई बेंडखळे, गायक हृषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आठल्ये यांनी केले आहे. निर्माता राजकुमार मेन्डा, सोनू मेन्डा, नफत्य दिग्दर्शक दिलीप मेस्त्राr-दीपा मेस्त्राr, फाईट मास्टर अंदलीब पठाण, लेखक अभिराम भडकमकर, मिलिंद सावे अशी श्रेयनामावली आहे. ‘बकाल’ येत्या 8 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

 

Related posts: