|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » खंडाळा बोरघाटाजवळ बसच्या भीषण अपघातात 5 ठार, 24 जखमी

खंडाळा बोरघाटाजवळ बसच्या भीषण अपघातात 5 ठार, 24 जखमी 

ऑनलाईन टीम / लोणावळा :

मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा बोरघाटाजवळच्या अमृतांजन पुलाजवळ खासगी बस पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

सर्वज्ञा सचिन थोरात (वय 3, रा. कराड), स्नेहा जनार्दन पाटील (15, रा. घाटकोपर), जनार्दन पाटील (45, रा. घाटकोपर), संजय शिवाजी राक्षे (50, रा. पवई) व प्रमिला रामचंद्र मोहिते (50, रा. बेलवले बु. कराड) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस कराडहून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन मुंबईकडे निघाली होती. दरम्यान, खंडाळ्यातील बोरघाटाजवळच्या अमृतांजन पुलाजवळ बसचालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस खोल दरीत जाऊन पलटी झाली. या अपघातात एका तीन वर्षीय मुलीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. 13 जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related posts: