|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » Automobiles » ‘हेलिया’ एका चार्जमध्ये धावते 900 किमी

‘हेलिया’ एका चार्जमध्ये धावते 900 किमी 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

केंब्रिज विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ‘हेलिया’ नावाची कार तयार केली आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर तब्बल 900 किलोमीटर धावते.

‘हेलिया’ या कारचा सर्वोत्तम वेग प्रति तास 120 किलोमीटर आहे. तर सामान्य वेग 80 किलोमीटर प्रतितास आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर 559 मैल म्हणजेच 900 किलोमीटर धावते. ही कार स्टँडर्ड इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जरने चार्ज केली जाऊ शकते. कारमध्ये 54 चौरस फुटाचे सोलार पॅनल असून, याची कार्यक्षमता 25 टक्के आहे, तर वजन 550 किलो आहे.

या कारला केंब्रिज विद्यापीठाच्या इको रेसिंग टीमने विकसित केले आहे. त्यामध्ये 20 पदवीधर विद्यार्थी आणि प्रोग्राम डायरेक्टर जियोफेन जैंग यांचा समावेश आहे. ही कार विकसित करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला आहे. पहिल्यांदा ही कार 19 ऑगस्ट 2019 रोजी लंडन सायन्स म्युझियममध्ये सादर करण्यात आली होती. नुकतीच ऑस्ट्रेलियात झालेल्या ब्रिजस्टोन वर्ल्ड सोलार चॅलेंजमध्येही ही कार उतरवण्यात आली. या कारमध्ये एकावेळी चार जण प्रवास करु शकतात.

Related posts: