|Sunday, December 8, 2019
You are here: Home » उद्योग » एलआयसीकडून ग्राहकांना दिलासा

एलआयसीकडून ग्राहकांना दिलासा 

दोन वर्षे बंद विमा पॉलिसी होणार सुरू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारतीय जीवन विमा निगमने (एलआयसी) आपल्या जुन्या पॉलिसीधारकांना दिलासा दिला आहे. दरम्यान, एलआयसीने पॉलिसीधारकांना दोन वर्षाहून अधिक काळ बंद असलेली पॉलिसी सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. नियमितपणे विमा हप्ता न भरल्यामुळे बंद झालेल्या पॉलिसींचा यात समावेश असेल, असे एलआयसीकडून सांगण्यात आले आहे.

जानेवारी 2014 नंतर खरेदी केलेले पॉलिसीधारक आता हप्ता भरण्यास असमर्थ असलेल्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत आणि पॉलिसी बंद होण्याच्या शेवटच्या दिनांकापूर्वी तीन वर्षे अगोदर पॉलिसी सुरू करू शकतात, असे एलआयसीने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) 2013 च्या नियमानुसार विमा कालावधीत ज्या तारखेपासून प्रीमियम थकीत आहे, त्या कालावधीपासून दोन वर्षाच्या आत कोणतीही पॉलिसी पुनरुज्जीवित केली जाऊ शकते. 1 जानेवारी 2014 पासून आयआरडीएचा नियम लागू आहे. या तारखेनंतर घेण्यात आलेल्या विमा पॉलिसीचा जर दोन वर्षापेक्षा अधिक काळापर्यंत प्रीमियम भरला नसेल तर त्या पॉलिसीचे पुनरुज्जीवन केले जाऊ शकत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts: