|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » क्रिडा » राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी 39 कनिष्ठ महिलांची निवड

राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी 39 कनिष्ठ महिलांची निवड 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑस्ट्रेलियात होणाऱया तिरंगी हॉकी स्पर्धेच्या तयारीकरिता कनिष्ठ राष्ट्रीय शिबिरासाठी हॉकी इंडियाने 39 महिलांची निवड केली आहे.

बेंगळूरमधील साई केंद्रात हे शिबिर सोमवारपासून सुरू झाले असून 28 नोव्हेंबरपर्यंत ते चालणार आहे. प्रशिक्षक बलजीत सिंग सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेतले जात आहे. 3 डिसेंबरपासून सुरू तिरंगी स्पर्धेत ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड संघाविरुद्ध भारताचे सामने होणार आहेत. ‘गेल्या महिन्यात झालेल्या शिबिरात सर्व खेळाडूंना कठोर परिश्रम घ्यावे लागले. परिणामी त्यांच्यात विविधांगी सुधारणा झाल्याचेही दिसून आले. मात्र ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडकडून आम्हाला कडवा प्रतिकार होण्याची अपेक्षा असल्याने आम्ही काही नव्या गोष्टीत सज्ज होण्यासाठी शिबिरात प्रयत्न करणार आहोत,’ असे सैनी म्हणाले. गेल्या जूनमध्ये बेलारुस दौऱयात कनिष्ठ महिला संघाने चमकदार प्रदर्शन घडविले. पण त्यापेक्षा सरस प्रदर्शन आम्हाला येत्या स्पर्धेत करावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.

शिबिरासाठी निवडलेले खेळाडू : गोलरक्षिका-राशनप्रीत कौर, खुशबू, एफ.रामेंगमावी. बचावपटू-प्रियांका, सिमरन सिंग, मरिना लालरामांघाकी, गगनदीप कौर, इशिका चौधरी, जोतिका कालसी, सुमिता, अक्षता ढेकळे, उषा, परनीत कौर, महिमा चौधरी, सुमन देवी थौडम. मध्यफळी-बलजीत कौर, मरियाना कुजुर, किरणदीप कौर, प्रभलीन कौर, प्रीती, अजमिना कुजुर, वैष्णवी फाळके, कविता बागडी, बलजिंदर कौर, सुषमा कुमारी, री, चेतना, बिछू देवी खारिबम. आघाडी फळी-मुमताज खान, ब्युटी डुंगडुंग, गुरमैल कौर, दीपिका, लालरिनडिन्की, जीवन किशोरी टोपो, रुतुजा पिसाळ, संगीता कुमारी, योगिता बोरा, अन्नू, शर्मिला देवी.

Related posts: