|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » लोकहिताच्या निर्णयासाठी संपूर्ण सहकार्य राहील : खासदार श्रीनिवास पाटील

लोकहिताच्या निर्णयासाठी संपूर्ण सहकार्य राहील : खासदार श्रीनिवास पाटील 

प्रतिनिधी/ सातारा

खासदार श्रीनिवास पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेत जिह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे व इतरांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच केंद्र सरकारकडे पाठपुरावा कराव्या लागणाऱया कामांचा तपशीलही जाणून घेतला.

यावर्षी जिह्यात अतिवृष्टी झाली आहे, तर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेती पिकांचे, व्यापारी वर्गाचे व सर्वसामान्यांचेही नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गासह इतर घटकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. पावसाने झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता असून शासनाकडून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी खासदार पाटील यांनी सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेतली. त्यांच्याकडून अतिवृष्टीमुळे सातारा जिह्यातील झालेल्या नुकसानीची व शासकीय पातळीवर करण्यात आलेल्या पंचनाम्याची सविस्तर माहिती घेतली.

 यावेळी विविध विषयांवर चर्चा करून केंद्र शासनाकडे जिह्यातील कामांचा पाठपुरावा करावा याबाबत सूचना केली. तसेच लोकहिताचे निर्णय व उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण सहकार्य करण्यात येईल. याशिवाय माजी अधिकारी म्हणून असलेल्या अनुभवाचाही उपयोग करू, असे आश्वासनही खासदार श्रीनिवास पाटील यांनी यावेळी दिले. याप्रसंगी सारंग पाटील हे देखील उपस्थित होते.

Related posts: