|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » सांगली-कोल्हापूरकरांना शक्य तेवढी मदत करा : अजिंक्य राहणे

सांगली-कोल्हापूरकरांना शक्य तेवढी मदत करा : अजिंक्य राहणे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महापुरामुळे सांगली आणि कोल्हापुरातील जनतेचे संसार उद्धवस्त झाले आहेत. ते या महाप्रलयातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने या शेतकऱयांना शक्य तेवढी मदत करावी, असे अजिंक्य राहणे याने म्हटले आहे. त्याने यासंदर्भात ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.

‘आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा.’ असे ट्विट अजिंक्य राहणेने केले आहे.

तर शेतकरी दिवस रात्र मेहनत घेतात, त्यामुळे आपल्याला जेवण मिळते. मी घरी असो किंवा हॉटेलमध्ये जेव्हा जेवतो ते शेतकऱयांमुळेच. त्यामुळे त्यांना कधी विसरू नये, आपल्याकडून जी काही मदत करता येईल ती करावी, असे अजिंक्यने यापूर्वीही पुण्यातील एका कार्यक्रमात म्हटले होते.

Related posts: