|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पीआयसीच्या वतीने ५ व्या पीडीएनएसचे आयोजन

पीआयसीच्या वतीने ५ व्या पीडीएनएसचे आयोजन 

पुणे / प्रतिनिधी :  

वैचारिक व्यासपीठ अर्थात ‘थिंक टँक’ म्हणून ओळखल्या जाणा-या पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात पीआयसी, दिल्ली मधील पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह फाउंडेशन (पीपीएफ), छत्तीसगड मधील द ट्रीब्यून ट्रस्ट आणि पुण्याच्या सेंटर फॉर  अ‍ॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज (सीएएसएस) यांच्या वतीने येत्या शुक्रवार, दि. ८ व शनिवार, दि. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी दोन दिवसीय ‘पुणे डायलॉग ऑन नॅशनल सिक्युरिटी’ (पीडीएनएस) या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. पीआयसीच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ही सलग पाचवी सुरक्षा परिषद असून यामध्ये संरक्षण विषयक तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात नव्या कल्पना समोर याव्यात, त्यावर चर्चा व्हावी या उद्देशाने सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेबरोबरच अन्न, पाणी, आरोग्य, उर्जा, तंत्रज्ञान व रोजगार या बाबतही चर्चा यावेळी करण्यात येईल. या चर्चेमध्ये देशातील अंतर्गत संघर्ष तसेच भौगोलिक व सामरिक विषयांवर उहापोह करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर यामध्ये होणा-या चर्चेचा अहवाल भारत सरकार व संबंधित केंद्रीय विभागाला पाठविला जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शांग्रीला डायलॉग’ येथील भाषणात नमूद केलेल्या मुद्द्यांवर  आधारित ‘इंडो- पॅसिफिक’ या विषयावर पहिल्या दिवशी चर्चा करण्यात येईल. याबरोबरच दुस-या दिवशी ‘आर्थिक व हवामान सुरक्षा’ या विषयावर तज्ज्ञ आपली मते मांडतील.

सदर सुरक्षा परिषदेत अर्थतज्ज्ञ, संशोधक, सुरक्षा विश्लेषक, सुरक्षा तज्ज्ञ आणि सरकारी सेवानिवृत्त अधिकारी सहभागी होणार असून यामध्ये माजी नौदल प्रमुख, अ‍ॅडमिरल (निवृत्त) अरुण प्रकाश, माजी हवाई दल प्रमुख पी. व्ही. नाईक, अंदमान निकोबारचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर भूपिंदर सिंग, भारताच्या राष्ट्रपतींचे माजी सचिव आणि अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे माजी विशेष सल्लागार श्रीनिवास सोहोनी, चीनमधील भारताचे  माजी राजदूत आणि पाकिस्तानमधील भारताचे माजी उच्चायुक्त गौतम बंबावले, प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ डॉ. नितीन देसाई, इंडिया डेव्हलपमेंट फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. शुभाशीष गंगोपाध्याय, गुप्तचर विभागाचे माजी संचालक पी. सी. हलदार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे माजी सल्लागार प्रा. अमिताव मलिक आणि मगरपट्टा टाऊनशिप डेव्हलपमेंट अँड कन्स्ट्रक्शन लि. चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर आदिंचा समावेश असणार आहे.

या परिषदेचा समारोप भारताचे माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांच्या उपस्थितीत होईल. पीआयसीचे विश्वस्त लेफ्टनंट जनरल (निवृत्त) शमशेरसिंग मेहता हे या परिषदेचे समन्वयक आहेत

Related posts: