|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हादई विषयी सरकार गंभिर नाही

म्हादई विषयी सरकार गंभिर नाही 

प्रतिनिधी/ पणजी

 गोवा फॉरवर्ड पक्षाने म्हादई प्रकरणात गोवा हरीत लवादाकडे तक्रार केल्याने सध्या  gमुख्यमंत्री नाराज झाले आहे. म्हादई प्रकरणात आम्ही केंद सरकारला दिलेल्या आव्हानाचे स्वागत न करता आमच्यावर उलट आरोप करत आहे मुख्यमंत्र्यांना म्हादइ &चे काहीच पडले नसून ते फक्त राजकीय स्वार्थ साधत आहे, असा आरोप गोवा फेरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी काल पणजीत अयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.

 गोवा फॉरवर्ड पक्ष म्हादई विषयात कुठलेच राजकारण करत नाही एक सामाजिक खपश्न असल्याने आम्ही या विषयी एनजीटीकडे दाद मागितली आहे. आम्ही यावर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. खरेतर हे काम सरकारचे आहे पण सरकारने यात काहीच गांर्भिय दाखवत नाही. भाजप सरकारच्या काळात गोवा फोरवर्ड जलसंवर्धन मंत्री असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हादई विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे गोवा फॉरवर्ड काहीच केले नाही असे हे सरकार सांगू शकत नाही, असे विजय सरदेसाई म्हणाले.

 डॉ. प्रमोद सावंत हे अपघाती मुख्यमंत्री झाले आहे त्यांना फक्त सत्ता टिकविणे हेच कळते. एवढा मोठा निर्णय घेतला हे त्यांना माहित आहे तरी त्यांनी यात काहीच केले नाही या विरोधात आवाज उठविल्यावर त्यांनी सर्वपक्षीय मंडळाला दिल्लीत नेले तेथेही आमची दिशाभुल करण्यात आली जर केंद्र सरकारला गोव्याची काळजी असती तर ते 10 दिवसात निर्णय घेता असे नसांगता ताबडतोब पर्यावरण दाखल रद्द करु शकले sअसते. यात फक्त डोळय़ाला पाणी पुसण्याची काम केले आहे, असे विजय सरदेसाई  म्हणाले.

 गोव्याचा मुख्यमंत्र्याला गोव्याचे काळजी असायला माहिजे मुख्यमंत्र्याचे काळजी ही गोमंतकीय असायला पाहिजे. त्यांनी कुठलेच राजकारण न करता गोमंतकीयाच्या हितासाठी निर्णय घ्यायला पाहिजे असेही मंत्री सरदेसाई म्हणाले.

Related posts: