|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विज्ञान, गणित स्थानिक भाषांमध्येही देणार

विज्ञान, गणित स्थानिक भाषांमध्येही देणार 

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची घोषणा

औदुंबर शिंदे/ कोलकाता

विज्ञान आणि गणित हे विषय फक्त शहरी विद्यार्थ्यांसाठी नसून ते ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केली आहे. कोंकणी, मराठी, हिंदीसह सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतर उपलब्ध करून देण्यात विज्ञान भारतीने पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. 5व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात ते बोलत होते.

 

थोर वैज्ञानिक सी. वी. रमण यांच्या नंतर विज्ञानातील नोबेल पारितोषिक भारताला मिळालेले नाही. यापुढे नोबेल पारितोषिक भारतालाच असेल याची काळजी घेण्यासाठी नवे वैज्ञानिक तयार करण्यास विज्ञान महोत्सव आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन हे भारतीयांना विदेशी आविष्कार  सांगण्यासाठी नसून, भारतीय वैज्ञानिकांची प्रगती विदेशांना सांगण्यासाठी आहे, असे ते म्हणाले.

वैज्ञानिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांची

मानसिकता बनविण्याचे प्रयत्न

वैज्ञानिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यावे यासाठी त्यांची मानसिक तयारी केली जावी यासाठी देशभरातील हजारो विद्यार्थी कोलकाता येथे गोळा केले गेले याचे सार्थक होईल असे ते म्हणाले.

या महोत्सवात काल बुधवारी विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी नवनवे प्रयोग शिकुन घेतले, अनेक प्रोजेक्ट सादर केले. विद्यार्थ्यांचे प्रकल्प पाहून विदेशी पाहुणेही थक्क झाले.

हेडगेवारच्या विद्यार्थ्यांची बाजी

गोव्यातून आलेल्या डॉ. के. ब. हेडगेवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात बाजी मारली. अनेक पुरस्कार प्राप्त केले. या विद्यालयातील अटल टिंकरिंग लॅब मधील ऋषिकेश भंडारी या विद्यार्थ्याची रशियात प्रकल्प सादर करण्यासाठी निवड झाल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

विज्ञान विषयात पत्रकारिता कशी करावी याचे मार्गदर्शन देण्यासाठी खास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात प्रसार भारतीचे वरि÷ अधिकारी आणि ज्ये÷ वैज्ञानिक पत्रकारांनी मार्गदर्शन केले.

‘वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्याची विद्यार्थांना संधी

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ करता काल बुधवारी झालेला प्रयत्न फसला, पण पुढील दोन दिवसात आणखी दोन वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी विद्यार्थांना मिळणार आहे. गुरुवारी शिवोली येथील श्री शांता विद्यालयाचे शिक्षक शशिकांत नाईक, मॅट्स लॅब हा विषय मांडणार आहेत. गणितातील गमती जमती सादर करणार आहेत. औदुंबर शिंदे त्यांना साहाय्य करतील. मनोज सावईकर त्यांची ओळख करून देतील.

या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात दुसऱया दिवशी अनेक परिसंवाद सादर झाले सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता झाली. आज गुरुवारी महोत्सवाचा तिसरा दिवस आहे.

Related posts: