|Saturday, December 14, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » आरसा कुठे असावा

आरसा कुठे असावा 

घरात आरसा नाही असं कधी होत नाही. अनेकांना आरशाची एवढी सवय असते की आपल्या खोलीत स्वतंत्रपणे आरसा बसवून घेतला जातोच. घरात आरसा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. पण या आरशाचे स्थान घरात योग्य जागी असावं लागतं. तो कुठेही असून चालत नाही.

घरात आरसा कुठेही लावून चालत नसतं. अनेकांना याबाबत सांगितलेलं पटत नाही, पण चुकीच्या जागी आरसा लावल्यास त्याचा प्रभाव जीवनात दिसून येतो. जर का आरसा योग्य जागी लावला तर अनेक फायदे आपल्याला होऊ शकतात. पण जर का त्याची जागा चुकली तर मात्र नुकसानही पदरी पडू शकतं. पाहु या घरात आरसा कुठे असावा ते-

खोलीत दरवाजाच्या मागे आरसा लावू नये. दरवाजाची दिशा ईशान्य असेल तर आरसा लावता येतो.

घरात उत्तर-पूर्व दिशेला आरसा लावावा. यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते, असे सांगितले जाते.

छोटय़ा आणि अचकट जागांमध्ये आरसा लावावा. याने विचीत्र अनुभव पदरी पडू शकतात.

आरशासमोर एखादी शुभ वस्तु असावी. याने आपल्या घरात आनंदी वातावरण राहील.

खिडकी व दरवाजासमोर आरसा असू नये.

खोल्यांमध्ये समोरासमोरच्या भिंतीवर एकमेकासमोर आरसे लावू नयेत. अशाने कुटुंबिय सदस्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडू शकतात.

आरसा भिंतीवर जास्त खाली आणि जास्त उंचीवर लावू नये. असे केल्यास शारीरिक तक्रारी उदभवू शकतात.

आरसा नेहमी स्वच्छ सुंदर असावा. तो तुटलेला नसावा. घाण व फुटलेल्या आरशाने घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार राहू शकतो.

आरशाचे रूप कसे उजळवाल-

आरसा असला तरी त्याचे रूप उजळवून टाकण्याच्या युक्त्या वापरता येतात. याने आरशाचे स्वरूपच पालटून जाऊ शकते. पाहु कोणते पर्याय अवलंबता येतील ते-

लाकडी चमचे- आईसक्रीमसोबत मिळणाऱया लाकडी चमच्यांचा वापर आरसे सजवण्यासाठी करता येतो. हे चमचे जमवून ते विविध रंगात रंगवून वाळल्यानंतर हे चमचे आरशांच्या पेमवर बसवता येतात.

चमकदार कापड- आपला आरसा अंडाकृती असेल तर चमकदार कापडाच्या सहाय्याने आरशाची बाजुची पट्टी सजवू शकता. रंगीत रिबनचा वापरही करता येतो. गोंडय़ांचाही वापर करून आरसा सजवता येईल.

शंख, शिंपल्यांचा वापरही आरशांच्या सुंदरतेसाठी करता येतो. बाथरूममधील आरशासाठी हा प्रयोग सूट होऊ शकतो.

गिफ्ट पेपर- आपल्याकडे एखादी भेटवस्तु घरी आली की त्यावरचा गिफ्ट पेपर आपण इथेतिथे टाकून देतो. याच पेपरचा वापर आरशाची किनार सजवण्यासाठी करता येतो.                            

Related posts: