|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कराडमध्ये अज्ञाताच्या गोळीबारात युवक ठार

कराडमध्ये अज्ञाताच्या गोळीबारात युवक ठार 

प्रतिनिधी / कराड

आगाशिवनगर (मलकापूर) ता. कराड येथे युवकावर बेछूट गोळीबार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. गोळीबारात विकी ऊर्फ विकास लाखे हा ठार झाला. लाखे याच्या नातेवाईंकांसह मित्रपरिवाराने कृष्णा रूग्णालयात गर्दी केली होती.

लाखे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. खुनाच्या घटनेनंतर कराड, मलकापूर, आगाशिवनगर परिसरात तणावाचे वातावरण होते. विकी लाखे याचा खून नेमका कोणत्या कारणाने झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळास सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, सर्जेराव गायकवाड, किशोर धुमाळ यांनी भेट दिली. घटनास्थळी पिस्टलच्या पुंगळ्यांसह कोयता सापडला आहे.  या घटनेनंतरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आगाशिवनगर, मलकापूर परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती.

खुनाच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना झाली असून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कराड, मलकापुरात ठाण मांडून होते. विकी लाखे याच्या खुनाची फिर्याद चंद्रकांत लाखे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली.

 

Related posts: