|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » संवाद » उपवासाचे घावन

उपवासाचे घावन 

साहित्य: 1 वाटी वरी तांदूळ, 1 वाटी साबुदाणे, 2 हिरव्या मिरच्या, 2 चमचे नारळाचा चव, 2 चमचे दाण्याचे कूट, 1 चमचा जिरे, चवीपुरते मीठ, साजूक तूप

कृती: साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वर 2 इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही 4-5 तास भिजवावे.

दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे.

गरम नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली की दुसरी बाजू नीट होवू द्यावी. गरम गरम घावन नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.

 

Related posts: