|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तारकर्ली समुद्रात बुडणाऱया पाच पर्यटकांना स्थानिकांनी वाचवले

तारकर्ली समुद्रात बुडणाऱया पाच पर्यटकांना स्थानिकांनी वाचवले 

मालवण

तारकर्ली रांज नाला समुद्रकिनाऱयावर समुद्रस्नानाचा आनंद लुटताना कोल्हापूर इचलकरंजी येथील पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची घटना गुरूवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. परंतु स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत पाचही पर्यटकांना समुद्रातून बाहेर काढले. अत्यवस्थ पर्यटकांना देवबाग ग्रामपंचयतीच्या रूग्णवाहिकेच्या मदतीने ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. एका पर्यटकाची प्रकृती गंभीर असून प्राथमिक उपचारानंतर पाचही पर्यटकांना अधिक उपचारासाठी दुपारी जिल्हा रूग्णलयात हलविण्यात आले.

कोल्हापूर इचलकरंची येथील 17 पर्यटकांचा ग्रुप बुधवारी पर्यटनासाठी मालवणात आला होता. सकाळी 12 वाजता या ग्रुपमधील समीना मिरासाहब मुजावर (33), रशिदा फिरोज सय्यद (38), सानिया मिरासाहब मुजावर (16), रमजान फिरोज सय्यद (22), तौफिब बाबासो सनदे (30 सर्व रा. इचलकरंजी, कोल्हापूर) हे पाच जण तारकर्ली रांजनाला किनाऱयावरील समुद्रावर समुद्रस्नान करण्यासाठी गेले. थोडय़ा वेळाने हे पाचही जण समुद्रात बुडत असल्याचे इतर पर्यटक स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आले.

Related posts: