|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पेणच्या ‘सुहित’ ला पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता सन्मान

पेणच्या ‘सुहित’ ला पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता सन्मान 

प्रतिनिधी /रत्नागिरी :

 मतिमंदांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱया पेण येथील ‘सुहित जीवन ट्रस्ट’ला यंदाचा ‘पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता सन्मान’ तर सुप्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक यांना ‘पुलोत्सव तरुणाई’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षामुळे या पुरस्काराला विशेष महत्व आहे. आर्ट सर्कल, रत्नागिरी आणि आशय सांस्कृतिक, पुणे यांच्यावतीने आयोजित पुलोत्सवाला आजपासून प्रारंभ होत असून या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणर आहेत. 

  पुलोत्सव तरूणाई पुरस्कारासाठी निवड झालेल्या मुंबईस्थित अनघा मोडक यांनी पुणे विद्यापीठातून जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. अस्मिता चित्र ऍपॅडमीमधून नाटय़शास्त्र आणि तसेच छायाचित्र कलेत पदवी संपादन केली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती या भाषांवर प्रभूत्व असून सध्या एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर मुलाखतकार म्हणून तर आकाशवाणीच्या एफएम गोल्ड वाहिनीवर रेडिओ जॉकी म्हणून मुंबई केंद्रांच्या अस्मिता वाहिनीवर निवेदिका म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक औद्योगिक संस्थांसाठी आवाज कला व आवाज शास्त्र यासाठी मार्गदर्शक म्हणूनही त्या कार्यरत आहेत. सावरकरांच्या चारित्र्याचा आढावा घेणारे गुणांकीत सावरकर, संवादाचे महत्व आणि संवाद कला या विषयावर बोलू ऐसे बोल, अध्यात्मातील विज्ञानावर आधारित ज्ञानियांचा विज्ञानु आदी विषयांवर त्या व्याख्याने देतात. ज्ञानप्रबोधिनीच्या छात्र प्रबोधन मासिकाच्या त्या सहसंपादिका होत्या. दूरदर्शन व आकाशवाणी या माध्यमासाठी ‘वॉईस ओवर आर्टिस्ट’म्हणून त्या काम करतात. 

 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे यंग ऍचिव्हर सह अनेक पुरस्कांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत.  एका आजारात डोळे गमावल्यानंतर त्यांनी केलेला संघर्षमय प्रवास हा आजच्या तरुणांना प्रेरणादायी आहे.  या कमतरतेचा कोणताही बाऊ न करता अत्यंत काटेकोरपणे आणि निष्ठेने काम करण्यासाठी ओळखल्या जाणाऱया अनघा यांचे नाव राज्यातील आघाडीच्या निवेदकांमध्ये अत्यंत आदराने घेतले जाते.

Related posts: