|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गद्दारांना काँग्रेस प्रवेश बंदीचे ठराव केंद्रीय नेतृत्वाला सादर

गद्दारांना काँग्रेस प्रवेश बंदीचे ठराव केंद्रीय नेतृत्वाला सादर 

प्रतिनिधी /पणजी :

काँग्रेस पक्षाबरोबर गद्दारी करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांना पक्षात प्रवेश दिला जाऊ नये, अशी मागणी करणारे तीन ठराव गोवा काँग्रेसने केंद्रीय नेतृत्वाला पाठविले अहेत. उत्तर गोवा, दक्षिण गोवा व प्रदेश कार्यकारिणीने घेतलेल्या ठरावांचा यामध्ये समावेश आहे. माजी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपात गेलेल्या आमदारांवर सहा वर्षासाठी बंदी घालावी, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे.

काँग्रेसला रामराम ठोकून तत्कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाची स्थिती राज्यात अत्यंत वाईट बनली आहे. दहा आमदार फुटल्यानंतर काँग्रेस पक्षात केवळ पाच आमदार राहिले आहेत. या फुटीमुळे नाराज बनलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यानी प्रदेश समितीकडे या आमदारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांना कधीच परत पक्षात प्रवेश दिला जाऊ नये यासाठी केंद्रीय नेत्यांपर्यतही मागणी करण्यात आली होती. अखेर उत्तर गोवा काँग्रेस जिल्हा समितीने बैठकीत ठराव घेऊन या आमदारांना सहा वर्षासाठी पक्षात बंदी घालण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. त्यानंतर काँग्रेस प्रदेश समितीनेही अशा प्रकारचा ठराव संमत केला.

या तिन्ही ठरावांच्या प्रति व त्याला पत्र जोडून गोवा प्रदेश समितीने केंद्रीय नेतृत्वाला हे ठराव पाठवून दिले आहेत. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या दहा आमदारांपैकी बऱयाच आमदारांना भाजप पुढील निवडणुकीत उमेदवारी देणार नाही याची जाणीव काँग्रेस नेत्यांना व कार्यकार्त्यांनाही आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास हे आमदार पुन्हा काँग्रेस पक्षात परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारचे ठराव दोन्ही जिल्हा समित्या व प्रदेश कार्यकारीनीने घेतले आहेत. हे ठराव केंद्रीय नेतृत्वाला पाठवले आहेत.

Related posts: