|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » मनोरंजन » प्रख्यात संतूरवादक डॉ. दैठणकर यांच्या ‘मूड्स ऍन्ड मेलडी’ मैफलीचे आयोजन

प्रख्यात संतूरवादक डॉ. दैठणकर यांच्या ‘मूड्स ऍन्ड मेलडी’ मैफलीचे आयोजन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य आणि पुणे येथील प्रख्यात संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर आणि त्यांचे पुत्र युवा संतूरवादक निनाद दैठणकर यांच्या ‘मूडस ऍन्ड मेलडी’ या संतूर वादन मैफलीचे आयोजन 9 नोव्हेंबर रोजी, संध्याकाळी 6.30 वाजता, बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड येथे करण्यात आले आहे.

दैठणकर पिता-पुत्रांच्या स्वरचित सुरावटींची मेजवानी या मैफलीद्वारे रसिकांना मिळणार असून, ही मैफल रसिकांसाठी विनामूल्य खुली आहे. या मैफलीव्दारे स्वर, लय आणि ताल यांच्या माध्यमातून दोन संतूरमधील आगळावेगळा संवाद रसिकांना अनुभवता येणार आहे. संतूरच्या तरल स्वरलहरिंमध्ये विविध प्रसंग, व्यक्तींमधील नातेसंबंध आणि विविधांगी भावभावना यांचा कलाविष्कार सादर केला जाणार आहे.

यावेळी डॉ. धनंजय दैठणकर आणि निनाद दैठणकर यांना डॉ. राजेंद्र दूरकर (पर्कशन्स), समीर पुणतांबेकर (तबला) आणि रोहित कुलकर्णी (की-बोर्ड) हे वादक कलाकार साथसंगत करणार आहेत. रसिकांसाठी विनामूल्य खुल्या असलेल्या या अनोख्या संतूर वादन मैफलीचा आस्वाद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: