|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » भारतीय डॉक्टर्सना ब्रिटनचा व्हिसा सुलभरीत्या मिळणार

भारतीय डॉक्टर्सना ब्रिटनचा व्हिसा सुलभरीत्या मिळणार 

वृत्तसंस्था/ लंडन

ब्रिटनच्या भारतीय वंशाच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी भारतीय डॉक्टरांना ब्रिटचा व्हिसा त्वरित आणि सुलभरीत्या देण्यासाठी पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले आहे. ब्रिटनमध्ये लवकरच संसदीय निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आश्वासन दिले आहे.

ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी हुजूर पक्षातच मतभेद निर्माण झाल्यामुळे मध्यावधी निवडणूक घेण्यात येणार आहे. 12 डिसेंबर हा मतदानाचा दिवस आहे. ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचा समाज मोठय़ा संख्येने असल्याने हुजूर पक्षाने या समाजाला सुखावह असणारे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

व्हिसा धोरणात बदल

ब्रिटनने सध्याची लॉटरी पद्धत बदलून ऑस्ट्रेलियाप्रमाणे गुणांकांच्या आधारावरील व्हिसा पद्धती आचरणात आणण्याचा विचार केला आहे. हुजूर पक्षाचा या निवडणुकीत विजय झाल्यास ही नवी पद्धत अंमलात आणण्यात येईल, असे पटेल यांनी स्पष्ट केले. या पद्धतीमुळे गुणवान तंत्रज्ञ तसेच डॉक्टर्स यांना लाभ होणार आहे. व्हिसा धोरणातील हा बदल प्रत्यक्षात उतरल्यास भारताचा सर्वाधिक लाभ होईल, अशी शक्मयता व्यक्त होत आहे.

भारतीय डॉक्टरांची मागणी

ब्रिटनमधील सर्वात मोठी म्हणून गणली जाणारी भारतीय डॉक्टरांची संघटना बीएपीआयओने व्हिसा धोरणात बदल करण्याची मागणी केली आहे. यासाठी संघटनेने सर्व राजकीय पक्षांमध्ये दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. हुजूर पक्षाने या प्रयत्नाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Related posts: