|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » गोड बोलून सेनेला संपविण्याचा भाजपचा प्रयत्न

गोड बोलून सेनेला संपविण्याचा भाजपचा प्रयत्न 

उद्धव ठाकरेंकडून पत्रकार परिषदेत भाजपच्या आरोपांचे खंडन

अमित शहा आणि कंपनी खोटारडी :

अशा लोकांसोबत मला नाते ठेवायचे नाही

मुंबई / प्रतिनिधी

अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यावरुन ठरले नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी सांगितल्यानंतर भाजप नेत्यांच्या या वक्तव्याचा  शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी चांगलाच समाचार घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराणे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. ठाकरे घराण्यावर पहिल्यांदाच कुणीतरी खोटारडेपणाचा आरोप केला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या वक्तव्याचा आधार घेऊन आम्हाला खोटे ठरवले आहे. शहा आणि कंपनीने कितीही खोटेपणाचा आरोप केला तरी खोटे कोण आणि खरे कोण हे सर्वांना माहित आहे. शहा आणि कंपनीच खोटारडी असून अशा लोकांसोबत राहायचे नसल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगताना भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांनी गेल्या 15 दिवस चाललेल्या शिवसेना आणि भाजपमधील सत्तासंघर्षावर पहिल्यांदा आपले भाष्य केले.

गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला. अमित शहा यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन पहिल्यांदाच माझ्यावर, ठाकरे कुटुंबियांवर खोटेपणाचा आरोप केला याचे दु:ख वाटले, असे ठाकरे म्हणाले. शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोप झाला आहे. अमित शहा यांच्या नावाचा वापर करुन काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलले आहेत, असा आरोप उद्धव यांनी केला.

मी चर्चा थांबवली हे खरे आहे. 50-50 चा फॉर्म्युला ठरलाच नव्हता; हे देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे साफ खोटे आहे असेही ठाकरेंनी स्पष्ट केले. मी खोटेपणा केलेला नाही. भाजप खोटेपणा करत असून सातत्याने भूमिका बदलण्याचा प्रकार त्यांनी केला आहे. मी दिलेला शब्द फिरवलेला नाही. ‘मातोश्री’वर जेव्हा अमित शहा आले होते तेव्हा जे काही ठरले होते; ते फडणवीस यांना ठाऊक आहे. मात्र, त्यांनी आता सध्या अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा विषय समोर आणला तर पक्षात माझी अडचण निर्माण होऊ शकते. मात्र, आपण समजून घेऊ असे मुख्यमंत्री त्यावेळी म्हणाल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

‘मी खोटारडा म्हणून शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही. जमत नाही असे म्हटले तर एकवेळ ठीक आहे. पण ठरलेच नाही हे सहन करणार नाही. खोटे बोलण्याचा हिशेब काढला तर अच्छे दिन, नोटाबंदीपासून कोण खोटे बोलले हे दिसेल’, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. माझ्याशी न बोलता साताऱयाची जागा घेतली, असा आरोप यावेळी उद्धव यांनी केला. उदयनराजे मोदींना काय म्हणाले होते ? त्यांनी कोणते पेढे वाटले ? असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. आधी नाणार रद्द केल्याचे सांगितले. मात्र, महाजनादेश यात्रेच्यावेळी नाणारबाबत फेरविचार करण्याचे वक्तव्य केले. उद्या 370 कलम पुन्हा आणण्याबाबत बोलाल, असा जोरदार टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला.

Related posts: