|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आरटीओ कार्यालयाबाहेरील अनाधिकृत टपऱया हटवण्याची मागणी

आरटीओ कार्यालयाबाहेरील अनाधिकृत टपऱया हटवण्याची मागणी 

प्रतिनिधी/ सातारा

भारत देश हा संविधानावर चालणार देश आहे. कायदा हा सर्वांसाठी आहे, परंतु काही ठिकाणी कायद्याचीच पायमल्ली होते. भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाते. भाजी मंडईत भाजी विक्री करणाऱया शेतकऱयाला बाजारसमितीतील कर्मचारी लायसन आहे का म्हणून विचारणा करतात, त्यांच्याकडून कारवाई होते. परंतु सातारा आरटीओ कार्यालयाबाहेर कोणताही परवाना नसताना बेकायदेशीर व्यवसाय करणारे एजंट व त्यांनी टाकलेल्या बेकायदेशीर टपऱयांवर कारवाई का केली जात नाही. त्यांच्या टपऱया काढण्यात याव्यात, अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे शशिकांत जाधव यांनी दिला आहे.

आरटीओ कार्यालयाचा परिसर म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. कार्यालयाच्या आवारात बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला इन गेट हे ऑफिसर क्लबच्या बाजूने होते. आता ट्रकचे कारण पुढे करत ते अलिकडच्या बाजूने घेतले असले तरीही ज्या बाजूला एंजट बसतात त्याच बाजूने करण्यात आले आहे. वाहन चालवण्याचा परवाना व इतर बाबींसाठी शासकीय दर वेगळे आणि एंजटाचे दर वेगळे आहेत. मन मानेल एवढे पैसे एंजट उकळतात. त्यांच्याकडून सरळ-सरळ लुटालुट केली जात आहे. हे कोणाच्या कृपेने यामध्ये अधिकाऱयांचे हात ओले असण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने या टपऱया काढून टाकण्यात याव्यात. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्हाला पालिका प्रशासन आणि आरटीओ कार्यालयाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे शशिकांत जाधव यांनी दिला आहे.::

Related posts: