|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ट्रक-कार अपघातात पाचजण जखमी

ट्रक-कार अपघातात पाचजण जखमी 

प्रतिनिधी/ निपाणी

ट्रक-कार अपघातात पाचजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजता महामार्गावर येथील आराम धाब्यानजीक घडली. या अपघातात इनोव्हा कारचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले.

 इनोव्हा कार क्र. (एमएच 14 ईवाय 4343) ही पुण्याहून निपाणीकडे येत होती. त्याचदरम्यान मालवाहू ट्रक क्र. (टीएन 32 एनव्ही 1415) हा पुण्याहून चेन्नईकडे चालला होता. ट्रक चालक दुराई याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोर जाणाऱया इनोव्हा कारला पाठीमागून जोराची धडक दिली. यात कारच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले. तर कारमधील चालक दत्ताभाऊ गाढवे, राजाभाऊ जाधव, पोपट बोडके, बाबू नांदलकर, बाळू बुचडे (सर्व रा. पुणे) हे पाचजण जखमी झाले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पुंजलॉईड कंपनीचे अधिकारी तसेच निपाणी शहर ठाण्याचे उपनिरीक्षक कुमार हडकर व साहाय्यक उपनिरीक्षक एम. जी. निलाखे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.

 

Related posts: