|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » leadingnews » काही वेळातच अयोध्या खटल्याचा निकालाला सुरूवात

काही वेळातच अयोध्या खटल्याचा निकालाला सुरूवात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील बाबरी मशीद आणि राम मंदिर जमिनीच्या मालकीच्या वादावरील निकालाचे वाचन काही वेळातच सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांचे खंडपीठ या निकालाचे वाचन करणार आहे.

134 वर्षांपासून हा निकाल प्रलंबित आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे 40 दिवस सुनावणी झाल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. राजकीय व सामाजिकदृष्टय़ा संवेदनशील विषयावरील निकालाचे वाचन सकाळी 10.30 वाजता सुरू होईल.

या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले असून, या पार्श्वभूमीवर राज्यात सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तसेच सशस्त्र दलांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियावरून विविध अफवा वा प्रक्षोभक संदेश पसरवले जाऊ नये, यावरही पोलिसांची करडी नजर आहे.

 

Related posts: