|Thursday, November 14, 2019
You are here: Home » Top News » भारतभक्तीही बळकट करा : नरेंद्र मोदी

भारतभक्तीही बळकट करा : नरेंद्र मोदी 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादग्रस्त जागेच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला कोणाचाही जय किंवा पराजय समजू नये, ही वेळ भारतभक्ती बळकट करण्याची आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर निर्णय दिला आहे. या निर्णयाला कोणाचाही जय किंवा पराजय समजू नये. रामभक्ती असो किंवा रहीमभक्ती, ही वेळ भारतभक्ती अधिक बळकट करण्याची आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी शांतता, सद्भावना आणि एकता कायम राखावी’, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे केले आहे.

राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादग्रस्त जमीन प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागा ही रामलल्लांचीच असून, या जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे. तर मुस्लिमांसाठी 5 एकर जमीन देण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Related posts: