|Monday, January 27, 2020
You are here: Home » Agriculture » एपीएमसीमध्ये वाहतूक कोंडीमुळे सर्वांची गैरसोय

एपीएमसीमध्ये वाहतूक कोंडीमुळे सर्वांची गैरसोय 

बेळगाव/प्रतिनिधी

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. यामध्ये बाजार समितीमध्ये होणारी वाहतूक कोंडी, रस्तागटारीचे अर्धवट राहिलेले काम, कचरा समस्या आणि स्वच्छता गृहांची दुरवस्था यामुळे बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा डोळेझाकपणा दिसून येत आहे.

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनागोंदी आणि बेजबाबदार वर्तनुकीमुळे बाजारात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शनिवार आणि बुधवार बाजारचे मुख्य दिवस यादिवशी हजारो वाहनांची बाजार समितीमध्ये वर्दळ असते. मात्र नियोजन शून्य कामकाजामुळे आणि संबंधितांच्या दुर्लक्षामुळे बाजार समितीमध्ये व्यवहार करताना शेतकरी, व्यापारी, खरेदीदार आणि वाहन चालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याला बाजार समिती कार्यकरणी आणि अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करत शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदाराकडून संताप प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

बाजार समितीला दोन प्रवेशद्वार आहेत. या प्रवेशद्वारामधून बाजार समिती कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजुनी गाडय़ा मोठय़ा प्रमाणात थांबविल्या जातात त्यामुळे प्रवेशद्वारामधून शनिवारबुधवार वाहने आत बाहेर जाताना वाहतूक कोंडी होत असते.

बेळगाव बाजार समितीमधील गटारी आणि रस्त्यांचे कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ता ठेकेदाराने सर्वत्र गटारी खोदून ठेवल्या आहेत. त्यामुळे या रस्तागटारीला लागणारे साहित्य आणि वाहने ठिकठिकाणी अडथळे निर्माण करत आहेत. भरीसभर म्हणून या रस्ता कामाच्या वाहनांची भर पडून कोंडीत मोठय़ा प्रमाणात भर पडत आहे.

Related posts: