|Thursday, November 14, 2019
You are here: Home » Top News » लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा निर्णय : फडणवीस

लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा निर्णय : फडणवीस 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेचा सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा भारतीय लोहशाहीच्या मुल्यांना मजबूत करणारा आहे, असे मत काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

अयोध्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादग्रस्त जागेचा निकाल हा देशात आस्था निर्माण करणारा आहे. जनतेने हा निर्णय अतिशय शांततेत स्विकारला आहे. त्यामुळे मी देशातील जनतेचे आभार मानतो.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुंबईसह महाराष्ट्रात चांगले वातावरण आहे. या निकालाकडे कोणीही जय-पराजय म्हणून पाहू नका. हा निर्णय लोकशाहीची मूल्ये अधिक बळकट करणारा आहे. त्यामुळे देशातील दोन्ही समाजाचे येणारे सण, उत्सव शांततेत पार पडावेत, असेही फडणवीस म्हणाले.

Related posts: