|Friday, February 28, 2020
You are here: Home » Top News » आजचा दिवस सोनेरी अक्षरांनी लिहावा असा : उद्धव ठाकरे

आजचा दिवस सोनेरी अक्षरांनी लिहावा असा : उद्धव ठाकरे 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

आज 9 नोव्हेंबर हा दिवस सोन्याच्या अक्षरात लिहून ठेवण्याचा दिवस. आज अयोध्या वाद मिटल्याचा आनंद आहे. अनेक वर्षांचा वाद आज अखेर संपला आणि आज, आपल्याला न्याय मिळाला आहे. न्यायदेवतेने दिलेला न्याय सर्वांनी स्विकारलेला आहे. याचा आनंद आहे, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आज, शिवसेना भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

ते म्हणाले, राममंदीरासाठी अडवाणींच योगदान मोठे आहे. लवकरच मी अडवाणींची भेट घेईन. त्याआधी 2-3 शिवनेरीला जाणार व त्यानंतर येत्या 24 तारखेला मी पुन्हा अयोध्येत जाईन. कारसेना हा नुसता लढा नाही तर हे मोठे आंदोलन होते. त्यावेळी ज्यांनी बलदान दिले त्यांना मी नतमस्तक होतो. आनंद जरूर व्यक्त करा, पण कोणाची भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन शिवसेनाप्रमुखांनी सर्व पक्ष, कार्यकर्त्यांना केले.

दरम्यान, सरकार कोणाचे असेल असा प्रश्न केला असता उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार नक्की बनेलच, पण आजचा दिवस हा आनंदाचा आहे. न्यायदेवतेने दिलेला न्याय आनंददायी आहे. आजच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंची आठवण स्वाभाविकच आहे.

 

 

Related posts: