|Sunday, November 17, 2019
You are here: Home » Top News » शिवसेनेला पाठिंबा देणे पक्षासाठी अनर्थकारी ठरेल : संजय निरुपम

शिवसेनेला पाठिंबा देणे पक्षासाठी अनर्थकारी ठरेल : संजय निरुपम 

ऑनलाईन टीम / मुंबई :

काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा दिला तर तो निर्णय पक्षासाठी अनर्थकारी ठरेल, अशी भीती मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे.

13 व्या विधानसभेची मुदत संपूनही राज्यात युतीचे सरकार स्थापन होत नसल्याने नवीन समीकरण जुळत आहेत. काँग्रेस आमदारांचा शिवसेनेला एकमताने पाठिंबा देण्याचा निर्णय जयपूरमधील बैठकीत झाला आहे. मात्र, काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये, तसे झाल्यास काँग्रेसवर आपत्ती ओढावेल, असेही निरुपम म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला शनिवारी संध्याकाळी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. युतीतील सत्तावाटपाचा प्रश्न सुटत नसल्याने इतर नवीन समीकरणे जुळत आहेत. राज्यात काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना-राष्ट्रवादीचे सरकार येण्याची शक्यता आहे. त्याला निरुपम यांनी विरोध दर्शविला आहे.

Related posts: